मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नायिकांपैकी एक नाव म्हणजे अमृता धोंगडे.
छोट्या पडद्यावरील मिसेस मुख्यमंत्री मालिकेतून ती नावारुपाला आली.
याशिवाय अभिनेत्रीने काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.
अभिनेत्री अमृता धोंगडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
सोशल मीडियाद्वारे अमृता तिचे विविध लुक्समधील फोटो शेअर करत असते.
नुकतंच तिने एक सुंदर फोटोशूट केलंय.
या फोटोशूटमध्ये तिने हटके आणि आकर्षक लूक साकारला असून, तिच्या या रूपाने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
निळ्या रंगाची ऑफ व्हाईट साडी, नाकात नथ आणि केसातील गजरा तिच्या लूकला पारंपरिक टच देत आहे.