अमृताने नुकतंच डॅशिंग लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अमृता धोंगडे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.
अमृताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं.
फोटोंमध्ये अमृताचा धाकड लूक पाहायला मिळत आहे. तिने जीन्स आणि जॅकेट असा लूक केला आहे.
फोटोशूटसाठी अमृताने खास पोझही दिल्या आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
अमृताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.