अमृता देशमुख ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अमृताला आपण आजवर वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून अभिनय करताना पाहिलंय.
अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःच्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अशातच अमृताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आकाशी रंगाची साडी, गळ्यात तन्मणी हार तसेच केसात गजरा माळून अभिनेत्री पारंपरिक अंदाजात पाहायला मिळते आहे.
तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.