मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे अमृता देशमुख.
'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेतून अमृताने कलाविश्वात पदार्पण केलं होतं.
याशिवाय अमृताने 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्ये भाग घेतला होता.
अमृता देशमुख कायमच सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
तिने शेअर केलेल्या फोटो तसेच व्हिडीओला चाहतेही चांगला प्रतिसाद देतात.
नुकतेच अभिनेत्रीने हिरव्या रंगाच्या साडीमधील खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अमृताच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय. हिरव्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुलून आलंय.