एक लाजरान साजरा मुखडा! 

‘अबोली’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी.

या मालिकेत गौरीने अबोली नावाची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली.

अलिकडेच या मालिकेने निरोप घेतला आहे. मात्र, गौरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 

आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी गौरी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.

नुकतंच अभिनेत्रीने पारंपरिक अंदाजात खास फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटसाठी तिने जांभळ्या रंगाची साडी आणि गळ्यात सुंदर नेकलेस असा खास लूक केला आहे.

गौरी या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत असून तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

या लाजऱ्या गालावरी विरघळला चांदवा!

Click Here