दोन वेण्या घालणाऱ्या 'रमा'चा क्लासी लूक पाहून पडाल प्रेमात
शिवानी मुंढेकरने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शिवानी सध्या स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेत काम करत आहे.
मालिकेतील 'रमा' या तिच्या भुमिकेने सर्वांचं मन जिंकलं आहे.
अभिनेत्रीने आता खास फोटोशूट केलं आहे, ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
ऑरेंज कलरच्या साडीत शिवानीचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
'मुरांबा' मालिकेतील रमा आणि अक्षयची जोडी लोकप्रिय झाली असून प्रेक्षकांना ती फार आवडते.