अभिनयासाठी सोडली पत्रकाराची नोकरी, कोण आहे ती?
अभिनय क्षेत्रात नाव, प्रसिद्धी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून असंख्य तरुण-तरुणी या क्षेत्रात येतात.
काहींना या क्षेत्रात यश मिळतं,तर काही अपयशी होऊन माघारी परत जातात.
अशीच एक मराठी अभिनेत्री जिने पत्रकारिता सोडून अभिनयाची वाट धरली.या अभिनेत्रीचं नाव सुरभी भावे आहे.
'राणी मी होणार', '36 गुणी जोडी' व 'सख्या रे' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री सुरभी भावे घराघरात पोहोचली.
सहज सुंदर अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने चाहत्यांची मनं जिंकली.
परंतु, तुम्हाला माहितीये का अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सुरभी भावे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत होती. एका मुलाखतीत तिने याबद्दल खुलासा केला होता.
सध्या ही अभिनेत्री 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेत वल्लरी नावाची खलनायिकी भूमिका साकारते आहे.