नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसतेय कमालीची सुंदर
बॉलिवूडची 'स्टाईल आयकॉन' मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.
वाढत्या वयासोबत अधिकच तरुण दिसणारी मलायका सोशल मीडियावर सक्रिय असून तिने नुकतेच तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
यावेळी मलायकाच्या नवीन हेअरकटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून तिचा हा नवा अवतार चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
मलायकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ब्लॅक कलरच्या डीप व्ही-नेक टॉपमध्ये दिसत आहे.
या ग्लॅमरस आऊटफिटमध्ये मलायका तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.
मात्र, या लुकमध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती तिच्या नवीन हेअरस्टाईलची.
मलायकाने एक नवा हेअरकट केला असून, त्यामुळे तिचा चेहरा अधिकच उठावदार दिसत आहे.
तिने हे फोटो शेअर करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.