'माझ्या नवऱ्याची बायको' फेम शनायाचं नवं फोटोशूट
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील.
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
त्यात तिने 'शनाया' हे निगेटिव्ह पात्रं साकारलं होतं. निगेटिव्ह असूनही तिला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं.
तिला या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. त्यातून रसिकाचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.
नुकतंच अभिनेत्रीने काही खास फोटोज चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रसिकाचा 'आयमेकअप' चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.
न्यूड लिपस्टिक, हलके ब्लश आणि सुटसुटीत हेअरस्टाईलमुळे सर्वांचे लक्ष तिच्या चमकदार डोळ्यांकडेच जात आहे.
"आनंद, अभिमान आणि सकारात्मकतेने भरलेली… तीच ऊर्जा सर्वत्र पसरवत आहे" असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलं आहे.