प्रियदर्शिनीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
प्रियदर्शिनी इंदलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचली. ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या दशावतार सिनेमातून प्रियदर्शिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
नुकतंच अभिनेत्रीने लेहेंग्यात खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
अगदी साधा पण तितकाच सुंदर लूक तिने केला आहे. कानातले आणि मांगटिका असा श्रृंगार केला आहे.
प्रियदर्शनीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.