प्राजक्ताने शकुंतला लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. प्राजक्ताचे हे फोटो मोहात पाडणारे आहेत.
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीची लाडकी अभिनेत्री. तिच्या अदांवर सगळेच फिदा असतात.
अभिनयासोबतच प्राजक्ता ओळखली जाते ती तिच्या फॅशन सेन्ससाठी.
वेगवेगळे लूक प्राजक्ता ट्राय करताना दिसते. तिचे हे लूक चाहत्यांच्या पसंतीसही उतरतात.
आता प्राजक्ताने शकुंतला लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. यामध्ये जणू ती राणीसारखी दिसत आहे.
प्राजक्ताचे हे फोटो मोहात पाडणारे आहेत. तिच्या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव करत आहेत.
अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता बिजनेस वुमनही आहे.
तिचा दागिन्यांचा ब्रँड आहे आणि कर्जतला तिचं फार्महाऊसही आहे.