पत्नी प्रियांका कारेकरसोबत गौरवने लग्नानंतर नव्या घरात गृहप्रवेशही केला.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता गौरव मोरेने लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला.
फिल्टरपाड्याच्या चाळीत राहिलेल्या गौरवने पवईच्या टॉवरमध्ये २ बीएचके घेतला.
गृहप्रवेशासाठी गौरवने सेलिब्रिटी आणि नेतेमंडळींनाही आमंत्रित केलं होतं.
सुषमा अंधारे यांनीदेखील गौरवला घरी जात शुभेच्छा दिल्या.
गौरवच्या घराच्या 'फिल्टरपाड्याचा बच्चन' नेमप्लेटने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.