'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील लोकप्रिय शो आहे.
या कॉमेडी शोमधून कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब हे नाव घराघरात पोहोचलं.
अभिनेत्रीने आपलं विनोदी कौशल्य आणि अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
शिवालीचा चाहतावर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतेच शिवालीने सोशल मीडियावर आपले काही नवीन फोटो शेअर केले आहेत, जे सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
या फोटोशूटमध्ये शिवालीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच त्यावर साजेसा लूक केला आहे.
या फोटोंमध्ये शिवाली खूपच ग्लॅमरस दिसते आहे.