मोनालिसाचा ग्लॅमरस लूक
महाकुंभ २०२५ मध्ये माळा विकण्यासाठी आलेली मध्य प्रदेशातील मोनालिसा एका रात्रीत सोशल मीडियावर स्टार झाली.
आज मोनालिसा इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. तिचा कायापालट झाला असून तिचे फोटो दररोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.
अलीकडेच मोनालिसाने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटने तिच्या चाहत्यांना घायाळ केलंय.
या फोटोशूटमध्ये मोनालिसा पांढऱ्या रंगाच्या स्टायलिश ब्लेझरमध्ये दिसत आहे.
ग्लॉसी मेकअप, मोकळे सोडलेले केस आणि पांढऱ्या रंगाचे कानातले तिच्या लूकला अधिकच आकर्षक बनवत आहेत.
हे फोटो पाहून चाहते तिच्या या सौंदर्याचं आणि क्लासी लूकचं कौतुक करताना थकत नाहीयेत.
खरं तर हे फोटो मोनालिसाच्या एका ब्रँड एंडोर्समेंटमधील आहेत.
लवकरच मोनालिसा एका चित्रपटात झळकणार आहे. अलीकडेच तिचा म्युझिक व्हिडीओ देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.