रणबीर-आलिया-विकीचा 'लव्ह अँड वॉर' 'या' दिवशी होणार प्रदर्शित
संजय भन्साळींनी चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
बॅालिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे.
रणबीर कपूर, आलिया भट आणि विकी कौशल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटाची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे. संजय लीला भन्साळी यांनी स्वतः सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
बहुप्रतिक्षित 'लव्ह अँड वॉर' चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे .