स्मृती इराणी यांनी मनोरंजन क्षेत्रासोबतच राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण केली.
'क्योंकी सास भी कभी बहु थी'ही त्यांची मालिका प्रचंड गाजली. यानंतर त्या राजकारणात आल्या आणि त्यांनी तिथेही आपला ठसा उमटवला.
स्मृती इराणी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहेत.
आता 'क्योंकी सास भी कभी बहु थी'चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातून पुन्हा एका स्मृती इराणी तुलसी बनून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून स्मृती इराणी या अभिनयापासून दूर राजकारणात सक्रीय होत्या.
स्मृती इराणी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पक्षातून केली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमेठीमधून निवडणूक लढवली आणि राहुल गांधी यांचा पराभव केला.
पण, २०१९ च्या निवडणुकीत राहुल गांधींना हरवून 'जायंट किलर' ठरलेल्या स्मृती इराणींचा २०२४ मध्ये अमेठीतून पराभव झाला. किशोरी लाल शर्मा यांनी त्यांना पराभूत केलं.
राजकारनंतर आता पुन्हा अभिनयाकडे वळालेल्या स्मृती इराणी यांच्याकडे निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, ८ कोटी ८३ लाख रुपयांची मालमत्ता आहे.