कृतिका कामरा किती वर्षांची?

अभिनेत्री 'क्रिकेट अँकर' गौरव कपूरशी लग्न करणार असल्याच्या चर्चा

बॉलीवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कृतिका कामरा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. 

कृतिका क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध चेहरा अँकर गौरव कपूर यांच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.

कृतिका आणि गौरव यांचा विवाहसोहळा येत्या मार्च महिन्यात मुंबईत पार पडणार असल्याचं समोर येतंय.

वयाच्या ३७ व्या वर्षी कृतिका लग्न करतेय. 

कृतिका कामराचा जन्म २५ ऑक्टोबर १९८८ रोजी मध्य प्रदेशात झाला होता.

कृतिका कामरा 'कितनी मोहब्बत है' या मालिकेतून घराघरात पोहोचली असून तिने 'बंबई मेरी जान' आणि 'तांडव' सारख्या वेब सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली आहे. 

गौरव कपूर हा त्याच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या युट्यूब शोसाठी आणि आयपीएल होस्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. 

आता या दोघांच्या लग्नाच्या तयारीला वेग आला असून चाहते आता या जोडीला लग्नाच्या बेडीत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Click Here