जरा हसली, जरा खुलली...!

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गिरिजा प्रभू.

सध्या गिरीजा स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेत कावेरी ही प्रमुख भूमिका साकारत आहे.

या मालिकेतील तिची ही भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. 

दरम्यान, गिरिजा तिच्या अभिनयासह सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओंमुळे देखील तितकीच चर्चेत असते. 

गिरिजाने नुकतंच पारंपरिक अंदाजात खास फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटसाठी तिने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे.

चाहत्यांना तिचा हा लूक आवडला असून अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

रणवीरची नायिका बॉलिवूड अभिनेत्रींवर पडतेय भारी! 

Click Here