'नांदेड'ची लेक हिंदी मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार

मेहनत, जिद्द आणि कलागुणांच्या जोरावर मालिकाविश्वात थेट मुख्य भूमिकेत केले पदार्पण

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील दाभड गावची लेक ईशा सूर्यवंशी हिंदी मालिका "मनपसंद की शादी" मध्ये'आरोही'ची भूमिका साकारत आहे

ईशाने पुण्यातील सिंबॉयसिस कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्टस् अँड मास कम्युनिकेशन (ऍडव्हर्टायझिंग व ऍक्टिंग) ही पदवी घेतली आहे

ईशाने अनुपम खेर यांच्या अभिनय अकॅडमीमधून डिप्लोमा पूर्ण केला. नाट्यक्षेत्रातही तिने अंब्रोसिया थिएटर्स सोबत २ वर्षे रंगभूमीवर काम केले

अभिनयासोबतच नृत्यकलेत विशेष प्राविण्य मिळवत तिने हैद्राबाद, दिल्ली, पटना आणि चेन्नई येथे अनेक भव्य स्टेज शो सादर केले

या विविध कलात्मक प्रवासामुळेच ईशा सूर्यवंशीला आज हिंदी मालिकाविश्वात मुख्य भूमिका करण्याची नामी संधी मिळाली आहे

ग्रामीण भागातील एका मुलीने कलेच्या माध्यमातून इतक्या मोठ्या व्यासपीठावर पोहोचणे ही प्रेरणादायी बाब आहे त्यासाठी ईशाचं कौतुक होत आहे

तिच्या जिद्दीला, मेहनतीला आणि कलागुणांना मिळालेला हा सन्मान दाभडसह नांदेड जिल्ह्याचा अभिमान वाढवणारा आहे

Click Here