कार्तिकी गायकवाडनं लेक रिशांकसोबतचे गोड फोटो केले शेअर 

चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड कायम चर्चेत असते. 

नुकतंच तिनं लेक रिशांकसोबतचे गोड फोटो शेअर केले आहेत. 

कार्तिकी व रिशांकचे हे क्यूट फोटो चाहत्यांना प्रचंड आवडलेत. 

कार्तिकीने पती रोनित आणि लेक रिशांक यांचेही अत्यंत प्रेमळ फोटो शेअर केले. 

या फोटोत रोनित आणि रिशांक यांच्यातील बाप-लेकाचं निर्मळ प्रेम स्पष्टपणे दिसून येतंय.

रिशांकच्या या फोटोवर चाहत्यांनी अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला आहे.

रिशांक या नावाचा अर्थ भगवान शिव यांचा भक्त असा होतो.

कार्तिकी गायकवाड गेल्यावर्षी आई झाली. गायिकेने १४ मे २०२४ रोजी पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सर्वांनी दिली होती.

Click Here