वर्षाला किती कमाई करते करिना कपूर? किती कोटींची आहे मालकीण...

'बेबो' करीना कपूर खानचा आज 45 वा वाढदिवस...

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान आज, 21 सप्टेंबरला आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

तिच्या यशस्वी अभिनयाच्या कारकिर्दीसोबतच तिची आलिशान जीवनशैली आणि प्रचंड संपत्तीही चर्चेत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, करीनाची एकूण संपत्ती सुमारे 485 कोटी रुपये आहे.

करीनाची कमाई प्रामुख्याने चित्रपटांमधून होते. ती प्रत्येक चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेते. 

याशिवाय, ती ब्रँड एंडोर्समेंटमधूनही मोठी कमाई करते. प्रत्येक ब्रँडच्या जाहिरातीसाठी ती सुमारे 5 कोटी रुपये घेते.

मालमत्तेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, करीना आणि तिचा पती सैफ अली खान यांच्याकडे मुंबईतील वांद्रे येथे 103 कोटी रुपयांचे आलिशान घर आहे. 

या व्यतिरिक्त, त्यांच्याकडे पतौडी पॅलेसचीही सह-मालकी आहे, ज्याची किंमत 800 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. 

महागड्या कार्सचा संग्रहही तिच्या आलिशान जीवनशैलीचा भाग आहे.