कामिया जानीचं फोटोशूट व्हायरल
भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर कामिया जानीचा अस्सल मराठमोळा अवतार पाहायला मिळाला आहे.
कामियाने मराठमोळी नऊवारी साडी परिधान करत चाहत्यांना घायाळ केलंय.
नेहमी वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसणाऱ्या कामियाचा हा पारंपरिक अवतार पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत.
नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर टिकली, हातात हिरवा चुडा आणि गळ्यात दागिणे असा साज श्रृंगार तिने केला.
तिने याआधीही अनेकदा महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती आणि पर्यटन स्थळांना आपल्या व्लॉग्सच्या माध्यमातून जगभर पोहोचवलं आहे.
मात्र, यावेळी तिने स्वतः महाराष्ट्रीयन वेशभूषा करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून मराठी चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी हजारो कमेंट्स केल्या आहेत.