'कमळी' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे केतकी कुलकर्णी.
या मालिकेत केतकीने साकारलेल्या अनिका नावाच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
केतकीने मराठीसह हिंदी मालिकाविश्वातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
केतकी सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. त्याद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतंच तिने साऊथ इंडियन लूकमध्ये एक खास फोटोशूट केलं आहे.
निळ्या रंगाची साडी त्यावर साजेसा गुलाबी ब्लाऊज परिधान करून अभिनेत्रीने सुंदर लूक केला आहे.
केतकीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्यांना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.