अभिनेत्रीचं काश्मीरच्या गुलमर्गमध्ये सुंदर फोटोशूट
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम जास्मीन भसीन सध्या काश्मीरच्या कुशीत निसर्गाचा आनंद घेत आहे.
जास्मीनने नुकतेच गुलमर्ग येथील बर्फाच्छादित डोंगररांगांमध्ये एक जबरदस्त फोटोशूट केले आहे.
निसर्गाच्या सानिध्यात जास्मीन भसीनचे हे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
गुलमर्गमध्ये बर्फाची चादर पसरलेली पाहायला मिळते आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये जास्मीन विविध पोझ देताना दिसत आहे.
तिचे फोटो पाहून ती तिथला प्रत्येक क्षण मनसोक्त जगत असल्याचे दिसून आलं.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
गुलमर्ग हे जम्मू आणि काश्मीर या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील बारामुल्ला जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे.