जिया शंकरचं फुलाफुलांच्या ड्रेसमध्ये फोटोशूट
अभिनेत्री जिया शंकर पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या जियाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये जियाने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड स्लीव्हलेस ड्रेस परिधान केला आहे.
या ड्रेसवर निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फुलांची आकर्षक डिझाईन असून, जिया यात अतिशय सुंदर दिसत आहे.
या ड्रेसवर जियाने लाइट टोन मेकअप केला होता. तर हेअरस्टाइलमुळेही तिचा लुक आकर्षक दिसतोय.
या फोटोंमध्ये जिया एखाद्या परीप्रमाणे भासत आहे. तिच्या या 'क्लासी' लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.
जिया तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते आणि यावेळीही तिने आपल्या फॅशन सेन्सने चाहत्यांना निराश केलं नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिया शंकर तिच्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली आहे.
जिया ही करण धनक नावाच्या व्यक्तीला डेट करत असल्याचं बोललं जातं आहे.