भारताची पहिली गायिका जिचा आवाज फक्त पृथ्वीवरच नाही तर अवकाशातही घुमतोय
४८ वर्षांपूर्वी भारतीय गायिकेने इतिहास रचला. तिचा सुमधूर आवाज थेट अवकाशात धाडला गेला
जयपूर घराण्याच्या कोल्हापूर येथील गायिका केसरबाई केरकर. १८९२ साली त्यांचा जन्म झाला होता
त्यांचं 'जात कहां हो' हे राग भैरवीमधलं गाणं नासाने अंतरिक्ष यान व्होएजर-१ आणि व्होएजर-२ च्या मदतीने १९७७ साली अवकाशात पाठवलं.
व्होएजर १ अवकाश यानात १२ इंचाची गोल्ड प्लेटेड तांब्याची डिस्क आहे. यामध्ये पृथ्वीवरील ५५ वेगवेगळ्या भाषेतील गाण्यांचा समावेश आहे
केसरबाईंचं 'जात कहां हो' हे गाणं भारतीय शास्त्रीय संगीताचं प्रतिनिधित्व करणारं गाणं म्हणून पाठवण्यात आलं
द साऊंड्स ऑफ अर्थ असं या अल्बमला नाव देण्यात आलं.
शास्त्रीय संगीत थेट अवकाशापर्यंत पोहोचवणाऱ्या या गायिका केसरबाई केरकर यांचं १६ सप्टेंबर १९७७ साली निधन झालं.