ऋता दुर्गुळेचा गोड लूक
ऋता दुर्गुळेसाठी २०२५ हे वर्ष खूपच खास ठरलं
ललित प्रभाकरसोबत तिचा 'आरपार' सिनेमा गाजला
आता तिची हिंदी वेबसीरिजही आली आहे आणि नवीन मराठी नाटकातही ती दिसत आहे
तसंच तिचा अभिनय बेर्डेसोबत 'उत्तर' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे
ऋताने या वर्षाचे आभार मानत हे क्युट फोटो पोस्ट केले आहेत
प्रिंटेड वनपीसमध्ये ती नेहमीप्रमाणेच गोड दिसत आहे
ऋताचा आणखी असाच उत्तमोत्तम अभिनय बघायला मिळो अशी चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे