हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
'उत्तरन' या टीव्ही मालिकेमधून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
केवळ मालिकाच नाही तर रश्मी देसाईने चित्रपटांमध्येही काम करुन दबदबा निर्माण केला आहे.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे पारंपरिक अंदाजातील खास फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये गुलाबी साडी, केसात गजरा आणि नाकात नथ असा साजशृंगार तिने केला आहे.
रश्मी देसाईच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
अभिनेत्रीचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.