नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय परमसुंदरी!
टीव्हीची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री हिना खान हिच्या फॅशन सेन्सचे लाखो चाहते आहेत.
तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना आवडतो. सध्या हिनाचं नवं फोटोशूट चर्चेत आलंय.
हिनाने तपकिरी रंगाचा स्टायलिश सिल्क शर्ट परिधान केला आहे, जो खूपच क्लासी दिसतोय.
या शर्टसोबत तिने चमकदार, मॅचिंग स्टार्स स्टड स्कर्ट घातला आहे.
तसेच तिने गळ्यात टाय देखील घातला आहे, ज्यामुळे तिचा लूक एकदम 'बॉसी' वाटतोय.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक फोटोमध्ये तिची आत्मविश्वासपूर्ण किलर पोझ तिच्या व्यक्तिमत्त्वाला चार चाँद लावतेय.
तिच्या 'बॉस' लूकवर चाहत्यांनी प्रेमाचा अक्षरशः वर्षाव केला आहे.
हिना खान सध्या टीव्ही "पती पत्नी और पंगा" मध्ये दिसत आहे आणि प्रत्येक एपिसोडमध्ये तिचा लूक जबरदस्त असतो.