'ए मेरे वतन के' आशाजी गाणार होत्या,पण...

१५ ऑगस्ट आणि 'ए मेरे वतन के लोगो' या गाण्याचं अतूट नातं आहे, पण या गाण्यामागची गोष्ट चक्रावून टाकणारी आहे...!

आजवर असा एकही स्वातंत्र्य दिन झाला नाही, जेव्हा हे गाणं वाजलं नाही आणि ते ऐकताना आपल्याला देशप्रेमाचे भरते आले नाही!

कवि पंडित प्रदीप यांचे शब्द, सी. रामचंद्र यांचे संगीत आणि लता दीदींचा दैवी स्वर या गाण्याला लाभला आहे, पण गोष्ट थोडी वेगळी आहे. 

हे गाणं लता दीदी म्हणणार नसून सी. रामचंद्र यांनी आशा भोसले यांची निवड या गाण्यासाठी केली होती असे म्हटले जाते. 

मात्र या गाण्याची चाल, शब्द, संगीत याच्या प्रेमात पडल्यामुळे दीदींनी आपल्यालाही हे गाणं म्हणता यावं म्हणून कवि पंडित यांच्याकडे वर्णी लावली. 

एकाच गाण्यासाठी आशा ताई आणि लता दीदी या दोघींचाही सराव सुरु झाला. 

मात्र जेव्हा दिल्लीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर हे गाणं सादर करण्याची तारीख ठरली, त्यात फक्त दीदींचं नाव पुढे करण्यात आलं. 

गाणं प्रकाशित झालं, या गाण्याने इतिहास रचला, न भूतो न भविष्यति प्रसिद्धी मिळवली आणि भारतीयांच्या काळजाला हात घातला. 

सी. रामचंद्र आणि दीदी यांच्यात मतभेद आणि मनभेद होते, तरीसुद्धा दीदींच्या आवाजाच्या प्रेमात असलेल्या सी. रामचंद्र यांनी आक्षेप घेतला नाही. 

हे गाणं लता दीदींचं झालं, पण तेच जर आशा ताईंच्या आवाजात असतं तर तुम्हाला आवडलं असतं का? कमेंट करून नक्की सांगा. 

Click Here