महागुरुंच्या सुधाच्या AI अवताराने ट्रेंडचा The End केला आहे.
सध्या Gemini चा AI ट्रेंड वापरुन सगळेच सोशल मीडियावर त्यांचे फोटो पोस्ट करत आहेत.
सेलिब्रिटींनाही या ट्रेंडचं वेड लागलं आहे. अशातच 'अशी ही बनवाबनवी'मधल्या सुधाचा AI अवतार समोर आला आहे.
emcee_hemant या इन्स्टाग्राम अकाऊंटने महागुरुंच्या सुधा या भूमिकेचे AI फोटो शेअर केले आहेत.
एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असं सुंदर रुप यात पाहायला मिळत आहे.
वेगवेगळ्या लूकमधील सुधाचे हे AI फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
महागुरुंच्या सुधाच्या AI अवताराने ट्रेंडचा The End केला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.