गौतमी तिच्या अदांसाठी नेहमीच चर्चेत असते
आपल्या दिलखेचक अदा आणि ठसकेबाज लावणीने अनेकांच्या मनावर राज्य करणारी नृत्त्यांगणा म्हणजे गौतमी पाटील.
‘सबसे कातिल, गौतमी पाटील’ अशी ओळख असलेली गौतमी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
गौतमी सोशल मीडियावर गौतमी तिचे अनेक फोटो तसंच लावणीचे व्हिडीओ शेअर करत असते.
अशातच गौतमीने तिच्या सोशल मीडियावर नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत.
हा लूक गौतमीनं 'सोनचाफा' गाण्याचं शुट करताना केला होता.
हे फोटो 'सोनचाफा' गाण्याच्या शुटिंगदरम्यानचं काढलेले असल्याचं दिसलं.
गौतमीने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद व्यक्त केला आहे.
दरम्यान, गौतमी नुकतीच एका अपघातामुळे चर्चेत आली होती, जिथे तिच्या गाडीने एका रिक्षाला धडक दिली होती.