पूजा सावंतनेही कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव साजरा केला. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरू असून जल्लोष पाहायला मिळत आहे.
अनेक सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत.
गणेशोत्सवासाठी पूजाने खास पारंपरिक लूक केल्याचं दिसून आलं.
कुटुंबीयांसोबतचे काही खास क्षण अभिनेत्रीने शेअर केले आहेत.
'विघ्नहर्ता' असं कॅप्शन पूजाने या फोटोंना दिलं आहे.