नजरेची जादू अशी की काळीज चोरून जाते

गणेशोत्सवानिमित्त आलिया भटचे गुलाबी साडीत फोटोशूट

आलिया भटने गुलाबी रंगाची साडी परिधान करून एक सुंदर फोटोशूट केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये आलियाने गुलाबी रंगाची चमकदार साडी नेसली. तिच्या साडीच्या काठावर डिझाइन्स आहे. यामुळे तिच्या संपूर्ण लूकला एक राजेशाही थाट मिळाला आहे. 

साधी हेअरस्टाईल आणि हलका मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. 

साडीसोबत तिने मोठे सोन्याचे झुमके आणि हातामध्ये बांगड्या घातल्या आहेत. 

एका फोटोमध्ये आलिया तिची सासू नीतू कपूर यांच्यासोबत गणपती बाप्पाचे दर्शन घेताना दिसत आहे. 

या पारंपरिक लूकमधील आलियाचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत आणि सोशल मीडियावर तिचे कौतुक केले जात आहे.

आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार आहे. संजय लीला भन्साळींच्या या सिनेमात रणबीर कपूर आणि विकी कौशल यांचीही भूमिका आहे. 

तसंच आलिया यशराजच्या स्पाय युनिव्हर्समधील 'अल्फा' सिनेमात फुल अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत शर्वरी वाघचीही मुख्य भूमिका आहे.

Click Here