अभिनेत्री सायली संजीवच्या घरी बाप्पाचं आगमन 

गुलाबी साडीत अभिनेत्रीचा पारंपरिक लूक

आज सगळीकडे मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी साजरी होत आहे. थाटामाटात बाप्पाचं आगमन झालं आहे. सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. 

अभिनेत्री सायली संजीव हिने आपल्या घरी पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.

 दरवर्षीप्रमाणे यंदाही तिने पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करत उत्सव साजरा केला. 

सायलीने कुटुंबासह पूजन करून बाप्पाचं मनोभावे स्वागत केलं.

"पद्माक्षी आणि अत्तूचा बाप्पा" या कॅप्शनसह गणेशोत्सवाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली.

गुलाबी रंगाच्या साडीत सायलीचा पारंपरिक लूक शोभून दिसला.

तिने फुलांच्या वलयामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती सजवली आहे. ही देखणी आरास लक्ष वेधून घेत आहे.

 पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करून अभिनेत्रीने पर्यावरणाबद्दलची आपली बांधिलकी दाखवली आहे.

Click Here