फरहानाचा स्वॅग तर लय भारीच!

जाणून घ्या तिच्याबद्दल सर्व काही

बिग बॉस १९ मध्ये घरात एन्ट्री घेताच सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धक म्हणजे फरहाना भट. 

तिच्या बोलण्याच्या अंदाजाने, आत्मविश्वासाने आणि खेळातल्या स्ट्रॉन्ग पॉलिटिक्सने ती चर्चेचा विषय ठरली आहे.

तिच्या एकंदर व्यक्तिमत्वाचं, स्वॅगचं नेटकरी कौतुक करतात. 

मूळची काश्मीरची असलेली फरहाना भट एक अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आहे.

अभिनयाची सुरुवात तिने टीव्ही जाहिरातींमधून केली आणि नंतर काही वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली. 

बिग बॉसच्या घरात आल्यानंतर फरहानाच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

बिग बॉसच्या घरात फरहानानं तिच्या वडिलांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा खुलासा केला होता. वडिलांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे तिला लग्नाची भीती असल्याचं तिनं सांगितलं होतं.

बिग बॉस १९ ची ट्रॉफी ती जिंकते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Click Here