अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड वयाने लहान, करतेय ट्रोलिंगचा सामना

स्वीडिश अभिनेत्री एली अवराम सध्या चर्चेत आहे. याचे कारण युट्यूबर आशिष चंचलानीसोबत तिचा व्हायरल झालेला रोमँटिक फोटो.

खुद्द आशिष चंचलानीनेच हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे या नवीन रिलेशनशिपमुळे ती चर्चेत आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, एली अवराम सध्या ज्या आशिषसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, तो तिच्यापेक्षा वयाने लहान आहे.

एलीने काही हिंदी सिनेमा आणि एका मराठी सिनेमात काम केलं आहे. त्याचदरम्यान, तिचं अनेकांसोबत नाव जोडलं गेलंय.

एलीचं निरागस सौंदर्य पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल यात वादच नाही, पण तिचे आधीचे बॉयफ्रेंड वयाने मोठे किंवा बरोबरीचे होते.

क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतदेखील एलीच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. दोघे काही इव्हेंट्समध्येही एकत्र दिसले होते.

सध्या एली आणि आशिष रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानलं जातंय. ती ३४ वर्षांची तर तो ३० वर्षांचा असल्याने त्यांनाही ट्रोलही केलं जातंय.

Click Here