तुम्हाला माहितीये का ऐश्वर्या हे अभिनेत्रीचं खरं नाव नाही.
ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री. अभिनयासोबत चर्चा होते ती त्यांच्या फिटनेस आणि सौंदर्याची.
ऐन पन्नाशीतही त्यांचा फिटनेस कमालीचा आहे. तर सौंदर्याच्या बाबतीत त्यांना ऐश्वर्यच प्राप्त झालंय.
पण, तुम्हाला माहितीये का ऐश्वर्या हे त्यांचं खरं नाव नाही.
अविनाश नारकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव ऐश्वर्या असं ठेवण्यात आलं.
बहिणीच्या सांगण्यावरुन अविनाश यांनी पत्नीचं नाव ऐश्वर्या असं ठेवलं होतं.
पण, लग्नाआधी मात्र ऐश्वर्या नारकर यांचं नाव वेगळं होतं. ऐश्वर्या यांचं खरं नाव 'पल्लवी' असं आहे.
पण, आता मात्र सगळे त्यांनी ऐश्वर्या या नावाने ओळखतात. याशिवाय त्यादेखील सगळीकडे ऐश्वर्या हेच नाव वापरतात.