दिवाळीनिमित्त सईने खास लूक केला आहे.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
दिवाळीनिमित्त सईने खास लूक केला आहे. नेहमी बोल्ड दिसणाऱ्या सईने साडीत पारंपरिक लूक केला आहे.
सईने गुलाबी रंगाची साडी आणि पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घालत लूक केला आहे.
केसांत गुलाबाची फुलं माळत सई नटल्याचं दिसत आहे.
कानात झुमके आणि गळ्यात सुंदर नेकलेस अशी मॅचिंग ज्वेलरी तिने घातली आहे.
सईचा हा पारंपरिक लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.