इंटरनेटवर फोटोंचा धुमाकूळ
आपल्या फिटनेस आणि बोल्ड फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री दिशा पाटनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
दिशाने नुकतेच गडद लाल रंगाच्या एका सिझलिंग आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये दिशाने एक अत्यंत स्टायलिश लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
या ड्रेसचा कट आणि डिझाईन दिशाच्या परफेक्ट फिगरला अधिकच उठावदार बनवत आहे.
दिशा नेहमीच तिचे वर्कआउट व्हिडीओ आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर दिशा पाटनी अलिकडेच 'O'Romeo' या चित्रपटात दिसली होती.
दिशाच्या लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर तिचं नाव सध्या पंजाबी गायक तलविंदरसोबत जोडलं जात आहे.
तलविंदर आणि दिशा हे दोघं अनेकदा एकत्र दिसले.