'धुरंधर'साठी रणवीरने तगडं मानधनही घेतलं आहे. ज्याची सर्वत्र चर्चा आहे.
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने सगळ्यांनाच वेड लावलं आहे.
या सिनेमात रणवीरने पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे.
हमजा अली बनून पाकिस्तानातील गँगस्टर रहमान डकैतच्या गँगमध्ये सामील होत त्याच्या कुरघोड्यांची माहिती तो देशाला पुरवतो.
या सिनेमातील रणवीरने साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे.
रणवीर सिंगने 'धुरंधर'साठी तब्बल ३०-५० कोटी मानधन घेतल्याची माहिती आहे.