'धुरंधर' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेलं नाव म्हणजे सारा अर्जुन.
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे.
करिअरमधील पहिल्याच सिनेमातून सारा अर्जुनला चांगलाच स्टारडम मिळाला.
या सिनेमात तिने रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त यांसारख्या अनुभवी कलाकारांसोबत काम केलं.
सध्या बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुस्साट आहे. शिवाय रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.
सारा अर्जुनने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता आणि ती तिच्या सौंदर्याने मोठ्या-मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे.
नुकतेच सारा अर्जुनने सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
सारा या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.