आदित्य धर लिखित, दिग्दर्शित धुरंधर हा सिनेमा ५ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला.
सध्या 'धुरंधर' चित्रपटामुळे अभिनेत्री सारा अर्जुन फार चर्चेत आहे. या चित्रपटात ती मुख्य नायिकेच्या भूमिकेतून झळकत आहे.
साराने या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. धुरंधर मधील साराच्या कामाची सगळेच प्रशंसा करत आहे.
अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
अभिनेत्री सारा अर्जुनने नुकतेच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
गुलाबी रंगाचा ड्रेस, सुंदर हेअरस्टाईल करून अभिनेत्रीने साज-शृंगार केला आहे.
सारा अर्जुन या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे. तिच्या या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.