भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि अभिनेत्री धनश्री वर्मा यांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर धनश्रीने जुन्या आठवणी मागे सारून आयुष्यात पुढे जाण्यास सुरुवात केली आहे.
धनश्री वर्मा लवकरच सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. ती तेलुगू चित्रपटात दिसणार आहे.
निर्माते दिल राजू यांच्या आकाशम दति वास्तव या चित्रपटात ती अभिनय करताना दिसणार आहे.
याच दरम्यान, धनश्रीचा एक रॉयल लूकमधील फोटोशूट तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
धनश्री राजघराण्यातील राणीप्रमाणे सजली आहे. तिच्या लाल साडीवर नक्षीकाम अतिशय मनमोहक आहे.
दुसऱ्या लूकमध्ये ती लाल रेशमी शाल पांघरून डिझायनर साडी नेसून व्हिंटेज कारजवळ उभी दिसत आहे.
Your Page!