अभिनय क्षेत्रातच करतेय काम, फोटो पाहून म्हणाल अतिसुंदर!
'देवमाणूस' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता किरण गायकवाड अत्यंत लोकप्रिय झाला आहे.
अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत लग्नगाठ बांधून किरणने नव्या आयुष्याला सुरुवात केली.
वैष्णवीने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
'तू चाल पुढं', 'देवमाणूस' आणि 'तिकळी' या मालिकांमध्ये काम केलं आहे.
किरण आणि वैष्णवीची पहिली भेट देवमाणूस मालिकेच्या सेटवर झाली. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
१४ डिसेंबर रोजी कुटुंबीय आणि मित्र मंडळींच्या उपस्थित मोठ्या थाटात किरण-वैष्णवीचा विवाहसोहळा पार पडला.
दोघेही सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच त्यांचे सुंदर फोटो शेअर करत असतात.