दीपिका पादुकोणचे फोटो व्हायरल
बॉलिवूडची 'मस्तानी' म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या स्टाईल आणि सौंदर्याने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या दीपिकाने नुकतेच तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमधील तिचा क्लासी लूक पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडलेत.
दीपिकाने प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाइन केलेला 'स्टारफाल' सिल्हूट आउटफिट परिधान केला होता.
दीपिकाने तिच्या सौंदर्याला साजेसा असा मिनिमल मेकअप केला असून केसांची 'स्लीक बन' हेअरस्टाईल केली आहे.
हा लूक दीपिकाने ज्या पद्धतीने कॅरी केला, त्याचे जगभरातून कौतुक होत आहे.
यामध्ये तिची परफेक्ट फिगर स्पष्टपणे दिसून येत आहे.
या लूकला अधिक 'रॉयल' टच देण्यासाठी तिने सिल्व्हर ॲक्सेसरीजची निवड केली.