प्रियदर्शिनीने शेअर केले Photos
'दशावतार' हा मराठी सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमाने ७ दिवसात १० कोटींची कमाई केली आहे
नुकतंच सिनेमाचं प्रमोशन गोव्यातही करण्यात आलं. याची झलक कलाकारांनी दाखवली आहे
सिनेमातील वंदू म्हणजेच अभिनेत्री प्रियदर्शिनीने गोव्यातील फोटो शेअर केले आहेत
राखाडी रंगाची साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे
सहकलाकार सिद्धार्थसोबत तिची सिनेमात जोडी जमली आहे. त्याच्यासोबतही तिने फोटो शेअर केला आहे
तसंच सिनेमातील हिरो दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतही तिने फोटो पोस्ट केला आहे
सिनेमाच्या टीमला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही शुभेच्छा दिल्या. सर्व टीमचं खास फोटोसेशन झालं