'दशावतार' सिनेमाची एवढी चर्चा का होतेय?
सध्या 'दशावतार' या मराठी सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. पण, 'दशावतार' सिनेमाची एवढी चर्चा का होतेय?
'दशावतार' सिनेमातून कोकणातील पारंपरिक दशावतार या लोकनाट्याला अत्यंत सुंदरप्रकारे सादर केलं गेलं आहे.
दशावतार या लोकनाट्याबरोबरच अतिशय महत्त्वाचा पर्यावरणाचा सामाजिक संदेश दिला गेला आहे.
सुबोध खानोलकर यांचं दिग्दर्शन असलेल्या 'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाच्या ताकदीचं दर्शन घडतं.
या सिनेमात कोकणातील निसर्गरम्य सौंदर्य आणि ग्रामीण जीवनाचं अप्रतिम छायांकन केलं गेलं आहे.
सिनेमातील संवाद, गाणी, पारंपरिक नाट्यशैली व आधुनिक कथानक यांचा अप्रतिम मेळ बसवण्यात आला आहे.
या ५ कारणांसाठी थिएटरमध्ये जाऊन एकदा तरी 'दशावतार' सिनेमा अवश्य पाहा.