CID ही टीव्ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
या मालिकेतील सगळी पात्रं घराघरात पोहोचली असून प्रचंड लोकप्रिय झाली आहेत.
CID मालिकेतील फॉरेन्सिक एक्स्पर्ट डॉ. साळुंके हे पात्रदेखील खूप लोकप्रिय आहे.
हे पात्र साकारणाऱ्या कलाकाराचे नाव नरेंद्र गुप्ता असून ते मूळचे राजस्थानमधले आहेत.
१९८८ साली डीडी वाहिनीवरील 'वागळे की दुनिया'मधून त्यांनी अभिनयात पदार्पण केले.
नरेंद्र गुप्ता यांना १९९८ साली CID मालिका मिळाली आणि तेव्हापासून ते 'डॉ. साळुंके' झाले.
CID मालिकेत डॉ. साळुंके यांनी अनेकवेळा आपला लूक बदलण्याचा प्रयत्न केला आहे.
कधी हेअर ट्रान्सप्लांट तर कधी स्टायलिश दाढी यामुळे त्यांच्या वयाचा अंदाज लागत नाही.
पण डॉ. साळुंके म्हणजेच नरेंद्र गुप्ता हे खऱ्या आयुष्यात ६३ वर्षांचे आहेत. २१ जुलैला त्यांचा वाढदिवस असतो.