ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो रुचिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
सध्या सगळीकडे ख्रिसमसचे वारे वाहत आहेत. सेलिब्रिटीही दरवर्षी मोठ्या उत्साहात ख्रिसमस सेलिब्रेट करतात.
मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव हिनेदेखील ख्रिसमस सेलिब्रेशन केलं.
ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी रुचिराने लाल रंगाचा वन पीस ड्रेस घालत खास लूक केला होता.
यामध्ये रुचिराचा ग्लॅमरस लूक आणि खास अंदाज दिसत आहे. फोटोसाठी तिने खास पोझही दिल्याचं पाहायला मिळत आहे.
रुचिराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.